योगेश गांगुर्डे यांचा लेहचा प्रवास यशस्वीरित्या पार पडला


आज दिनांक दोन जुलै 24 रोजी महावितरण कंपनी शहादा येथे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत, आपले सर्वांचे परिचित आणि आवडते असे रायडर कामगार श्री योगेश गांगुर्डे साहेब शहादा ते कश्मीर व्हाया लेह असा प्रवास करून, जवळपास सात हजार किलोमीटरच्या अंतर असा विशेष प्रवास करून शहादा नगरीत त्यांच्या पुनरागमन झालेलेआहे .
त्यांच्या सत्कार तांत्रिक कामगार युनियनचे पदाधिकारी श्री गुलाबराव सोनवणे सोबत तांत्रिक कामगार श्री शांतीलाल वसईकर तांत्रिक कामगार श्री चेतन गिरासे यांनी फुलहार व बुके देऊन केला.तसेच तांत्रिक कामगार श्री संजोग साळी व श्री बापू चौधरी ह्यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला.
त्यांच्या ह्या मोठ्या साहसी प्रवासाबद्दल सर्वांना कुतूहल होते आणि आज त्यांनी विशेष अवघड प्रवास पूर्ण करून सर्वांना अचंबित केले आहे.


श्री योगेश गांगुर्डे यांचं समस्त महावितरण कंपनी कडून खूप खूप अभिनंदन आणि स्वागत.💝🌹🙏🏻