जगातील सर्वात दिव्य आणि दुर्लभ 11 फूट उंच आणि 21 टन वजनाची शेषशायी श्री नारायण मूर्ती इंदोर ते शहादा अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून 11 जानेवारी रोजी शहाद्यात होणार दाखल..


12 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत शहाद्यातील श्री नारायण पुरम तीर्थ मंदिरात साजरा होणार विशाल भक्तिमोत्सव…

शहादा:-
शहादा शहरातील श्री श्री नारायण पुरम तीर्थ मंदिरातील गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दखल घेतलेल्या जगातल्या विशिष्ट अशा 11 फूट उंच आणि 21 टन वजनाच्या पंचधातू पासून निर्मित शेषशाही विष्णू मूर्ती इंदोर ते शहादा असा 250 किलोमीटरचा प्रवास करून 11 जानेवारी 2025 रोजी शहादा येथील मंदिरात दाखल होणार आहे..
तीन दिवसीय भगवान विष्णू महा यात्रेचं आयोजन श्री श्री नारायण पुरम तीर्थ मंदिरात द्वारे करण्यात आला आहे..
9 जानेवारी2025 गुरुवार रोजी इंदोर येथील राजवाडा येथून सकाळी ही महाकाय मूर्ती भक्तांसहित निघणार असून
, राहू -महू -ठिकरी- वरुफाटक- जुलवानिया- गुजरी -सेंधवा- निवाली -पानसेमल -खेतिया असा मार्ग क्रमण करत 3 दिवसाच्या प्रवासाने शहादा येथे 11 जानेवारी2025 रोजी दाखल होणार आहे.. यावेळी 11 जानेवारीला शहादा नगर भ्रमण त्याचबरोबर सत्संग भजन कीर्तन आणि महापूजा असा आयोजन करण्यात आले आहे..


दिनांक 14 जानेवारीला विशाल भक्तिमोत्सवात उत्तरायण महापर्व म्हणजेच संक्रांतीला दुपारी 12 वाजेला ही विराट नारायण मूर्ती निर्माण होत असलेल्या नारायण मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करणार आहे..
दिनांक 12 जानेवारी2025 पासून 15 जानेवारी2025 पर्यंत शहादा शहरातील श्री नारायण पुरम तीर्थ मंदिरात सर्व कल्याण महापूजा आणि श्रीमद् भागवत कथेचे देखील आयोजन मंदिर समिती द्वारे करण्यात आले आहे..


या इंदोर ते शहादा विष्णू महायात्रेत.. महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील भक्तांचा समावेश होणार असून
या महायात्रेत भगवान विष्णूचे दुर्लभ दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री श्री नारायणपूरम श्री मंदिराच्या समितीद्वारे करण्यात आले आहे..