धडगाव पोलीस ठाणे गुरन 295/ 2023 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटर सायकल व गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील चोरीस गेलेल्या एकुण 15 मोटर सायकली 11,39, 000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 2 आरोपी अटक

धडगाव पोलीस ठाणे गुरन 295/ 2023 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटर सायकल व गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील चोरीस गेलेल्या एकुण 15 मोटर सायकली 11,39, 000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 2 आरोपी अटक

धडगाव (प्रतिनीधी):-माहे डिसेंबर-2023 मध्ये धडगाव पोलीस ठाणे हद्दितील पिंपळवारी येथिल संपत जोमसिंग ठाकरे यांची 1,05,000 रु. कि.ची KTM मोटार सायकल क्रमांक एम. एच-39 एएम 3125 हि चोरी झाल्या बाबत दिलेल्या फिर्याद वरुन धडगाव पोलीस ठाण्यात गुरन 295/2023 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोना/1155 दिपक वारुळे हे करीत असतांना पोलीस निरीक्षक इसामोद्दीन पठाण, धडगाव पोलीस ठाणे यांना गुप्त माहीती मिळाली की, एक इसम KTM मो.सा विक्री साठी धडगाव शहरातील शिक्षक कॉलनी जवळील गुराच्या दवाखान्या जवळ येत असल्याचे समजले पो.नि. पठाण धडगाव पोलीस ठाणे यांचे आदेशान्वये पोलीस पथक तयार करुन शिक्षक कॉलनी जवळील गुराच्या दवाखान्या जवळ जावुन दबा धरुन बसा असे सांगुन रवाना केले. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पथक हे शिक्षक कॉलनी येथे गुराच्या दवाखान्या जवळ जावुन दबा धरुन बसले असता त्यांना एक इसम KTM कंपनीची मोटार सायकल घेवुन येतांना दिसला त्यास पथकातील अंमलदारांनी थांबवुन चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला म्हणुन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव रेवस ओरजी वळवी रा. छापरी असे सांगितले पथकातील अंमलदार यांनी पोलीस ठाणे अभिलेखावरील मो. सा. चोरीच्या गुन्ह्याची पडताळणी केली असता संशयीत इसमाकडे मिळून आलेली मो. सा. ही धडगाव पो. ठाणे गुरन 295/ 2023 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातीलच असल्याचे खात्री झाल्याने पोना/1155 दिपक वारुळे यांनी दोन पंचासमक्ष मो.सा. जप्तीचा पंचनामा करुन संशयीत आरोपीतास ताब्यात घेवुन अटक केली आहे. अटकेतील आरोपीताकडे चौकशी केली असता त्याचे अजुन चार साथीदार असल्या बाबत सांगितले असुन त्यापैकी एक आरोपी राहुल हुरता वळवी रा. छापरी ता. धडगाव याचा शोध घेवुन त्यास अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपीतांना विचारपुस करुन त्यांचे कडुन एकुण 15 मो.सा. त्यांची किंमत 11, 39,000 अशा जप्त करण्यात आल्या आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस.

, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इसामोद्दीन पठाण, पोसई / राहुल पाटील, पोसई / रामकृष्ण जगताप, पोह/877 राजेंद्र जाधव, पोह/177 जयेश गावित, पोह/748 स्वप्निल गोसावी, पोना/1155 दिपक वारुळे, पोना/1117 शशिकांत वसईकर, पोना/75 कालुसिंग पाडवी, पोना/1080 योगेश निकम, पोना/1056 सुनिलकुमार सुर्यवंशी, पोकॉ/446 विनोद पाटील, पोकॉ/115 प्रतापसिंग गिरासे, पोकॉ/1293 हिरालाल सोनवणे, पोकॉ/198मनोज महाजन, पोकों / 80 विकास चौधरी, पोकॉ/673 किरण भिल, पोकॉ/1415 किरण पाडवी, पोकॉ/1218 अशोक पाडवी, पोकॉ/1180 जानसिंग वळवी, पोकों/225 देवमन चौधरी, पोकॉ/1337 विश्वजित चव्हाण, पोकों / 1407 मनोहर धनगर, यांनी केली आहे.