गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत शहादा विधानसभा मतदारसंघात आमदार राजेश पाडवी यांनी केलेल्या विकास कामे आणि त्यांच्या कार्य शैलीने प्रभावित होत शहादा तालुक्यातील मंदाना येथील असंख्य कार्यकर्त्यांनी सोमावल तालुका तळोदा येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला

पोलीस निरीक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर थेट विधानसभेची निवडणूक लढवून शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार झालेल्या राजेश पाडवी यांनी शहादा मतदार संघातील शहादा व तळोदा तालुक्यात गेल्या साडेचार वर्षाच्या आमदारकीच्या काळात असंख्य विकास कामे केली अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यासह कलावती फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य सेवा केली त्यांच्या या कार्या शैलीने प्रभावित होत शहादा तालुक्यातील मंदाना येथील किरण भंडारी, सुदाम ठाकरे, गियान अवया, हिम्मत भंडारी, संजय पटले ,कमेश रावतले, चिका भंडारी ,ललित भंडारी, भुऱ्या भामरे, जामसिंग तडवी, केशव महाराज, अक्षय भंडारी, सुकू महाराज,सुकलाल खर्डे ,शंभू भंडारी ,रामदास भामरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार राजेश पाडवी यांच्या सोमावल येथील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली व त्यानंतर भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार पाडवी यांनी सुरू केलेला विकास रथ अधिक जोमाने आम्ही यापुढे सुरू ठेवू असा निर्धार या वेळेस या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला

यावेळी, महामंत्री बळीराम दादा पाडवी, विधानसभा प्रभारी नारायण दादा ठाकरे, दरबार सिंग दादा, दारासिंग दादा लगन पावरा छोटू शिंदे शहाणा सरपंच रवींद्र पाडवी, माजी सरपंच किरण भंडारी उपस्थित होते