नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई! 26 हजाराची लाच स्वीकारताना विजय लोंढे,(गटविकास अधिकारी,वर्ग – 1),पं.स.अक्कलकुवा व रवींद्र लाडे,(सहाय्यक लेखापाल),पं.स. अक्कलकुवा यास अटक!
नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई! 26 हजाराची लाच स्वीकारताना विजय लोंढे,(गटविकास अधिकारी,वर्ग – 1),पं.स.अक्कलकुवा व रवींद्र लाडे,(सहाय्यक लेखापाल),पं.स. अक्कलकुवा यास अटक!
प्रतिनिधी, नितीन चौधरी – अक्कलकुवा
अंगणवाडी इमारतींच्या केलेल्या कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी 26000 हजार लाच स्वीकारताना अक्कलकुवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी (वर्ग 1) विजय लोंढे सहा.लेखापाल रवींद्र सुखदेव लाडे यांना रंगेहात पकडण्यात आले असुन अक्कलकुवा पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेतील तक्रारदार यांनी पंचायत समिती अक्कलकुवा व ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. नमुद तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदार यांनी आलोसे रविंद्र लाडे यांना वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु तक्रारदार यांची बिलाची रक्कम आलोसे यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केली नाही. यानंतरही तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता , आलोसे यांनी तक्रारदार यांच्या एका कामाचे बिल 2,46,850/- रु. ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले जे तक्रारदार यांना त्यांच्या बँक खात्यात मिळाले. परंतु आलोसे रविंद्र लाडे यांनी तक्रारदार यांचे एक बिल काढून दिल्याचा मोबदला व उर्वरित दोन बिलांची रक्कम काढण्यासाठी अशा एकूण तिन्ही बिलांच्या रकमेबाबत तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी 8,000/- रु. ची मागणी केली व आलोसे गट विकास अधिकारी विजय लोंढे यांच्यासाठी 18,000/- रु ची मागणी केली. पंचांसमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे रविंद्र लाडे यांनी 8,000/- रु लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली. तसेच आलोसेे विजय लोंढे यांनी तक्रारदार यांच्याकडून 18,000/- रु लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली. आलोसे रविंद्र लाडे यांच्या मार्फत तक्रारदार यांच्याकडून लाच मागण्याच्या व लाच स्वीकारण्याच्या कृतीस प्रोत्साहन दिले म्हणून अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला.
सदर कारवाई लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक,
राकेश चौधरी
हे.कॉ.विलास पाटील,
हे.कॉ. विजय ठाकरे, पोना.देवराम गावित,
पोना. हेमंत कुमार महाले,
पोना.सुभाष पावरा, पोना.नरेंद्र पाटील, पोना जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली