मुसळधार पावसामुळे नाल्यांना आलेल्या पुरात मोटरसायकल घसरुण सहा महिन्याचे बालक पाण्यात वाहून मूर्त


मुसळधार पावसामुळे नालेल्या आलेल्या पुरात मोटरसायकल घसरुण सहा महिन्याचे बालक पाण्यात वाहून गेले
शहादा शहरालगत असलेल्या नवीन तहसील कार्यालय जवळील भेंडवा नाल्याची घटना

काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भुलाने येथील मनोज भिल हा त्याच्या पत्नीसोबत व आपल्या सहा महिन्याच्या बाळासोबत गावाहून शहादा गावाकडे येत असताना मोहिदा गावाजवळील असलेल्या तहसील कार्यालयाजवळ आल्यानंतर तेथील नाल्यावरील फरशी पुलावरून जात असताना अचानक पाण्याचा जोर वाढल्यामुळे मोटरसायकल वरून खाली पडला आणि त्यासोबतच पत्नी आणि मुलगा खाली पडल्याने त्याच्या पत्नीने धरलेले बाळ पाण्याचा प्रवाहामुळे नाल्यात वाहून गेला …


सकाळी नाल्यालगत असलेल्या काटेरी झुडपात बालकनृत अवस्थेत आढळून आले..
भेंडवा नाल्यावरील असलेल्या या फरशी पुलाचे काम अतिशय निकृष्ट असल्याने तसेच रस्त्याच्या उंचीपेक्षा पुलाची उंची कमी असल्याने येथे सतत अपघात होत असतात यावर प्रशासन मात्र निरुत्तर आहे.

oplus_2

शहादा शहराजवळील भेंडवा नाल्यावरील झालेल्या घटनेची
शहादा तहसीलदार यांनी त्वरित पाहणी करत पंचनामा केला.
सकाळी ११वाजेच्या सुमारास बालक हा मयत अवस्थेत आढळून आल्याने प्रत्यक्ष दर्शींना अश्रू अनावर झाले…