शिवाजी मंदिर नाट्यगृह,दादर पश्चिम येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मा.श्री योगेश मसलगे पाटील यांचा सन्मान!

शिवाजी मंदिर नाट्यगृह,दादर पश्चिम येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मा.श्री योगेश मसलगे पाटील यांचा सन्मान!


महाराष्ट्र राज्यात लोकसभा 2024 निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दैदीप्यमान यश मिळाले आहे त्या अनुषंगाने सर्व सेलच्या वतीने राज्याचे प्रभारी मा रमेशजी चेन्नीथला प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या उपस्थिती मधे राज्यस्तरीय भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
लोकसभा 2024 निवडणुकीत रोजगार व स्वयंरोजगार काँग्रेस च्या वतीने मा योगेश मसलगे पाटील यांच्या नेतृत्वा खाली राज्याच्या काना कोपऱ्यात महाविकास आघाडी च्या उमेदवारचा प्रचार कार्य निवडणुकी काळात पक्षाने दिलेली जबाबदारी उत्कृष्ट पणे पार पाडली तसेच काँग्रेस गॅरंटी कार्ड याचा प्रचार,प्रसार घराघरात पोचविले गेले त्यामुळे महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळाल्या त्याबद्दल प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते फेटा, शाल, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
एक कार्यकर्ता ते महाराष्ट्राच्या एका विभाग प्रमुख पर्यन्त प्रवास अतिशय खडतर होता कोणतीही राजकीय पार्शवभूमी नसताना सामान्य कुटुंबांतील कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने दिलेला हा बहुमान अभिमानाची बाब आहे हे फक्त काँग्रेसच करू शकते त्यांचा प्रामाणिक पणा,पक्ष निष्ठा,नम्रपणा,साधेपणा,अथक परीश्रम,कायम कार्यकर्ता म्हणून स्वतःला झोकून देऊन काम केले त्याचे हे फलीत आहे.


राज्यातील रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सर्व विभागाच्या प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, ब्लॉक, तालुका, वॉर्ड, गट, गण प्रमुख इ कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे.व श्री.नाना भाऊ पटोले यांनी संभाजीनगर येथे श्री.योगेश भाऊ मसलगे पाटील यांना आमदारकीचे तिकीट द्यावे याकरिता निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष श्री धनंजय कुलकर्णी/काका, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. अजित भांबुरे, श्री जिल्हा सरचिटणीस श्री.संतोष मुळे, ॲड.प्रसाद खटावकर तसेच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार स्वयंरोजगार विभागाचे सर्व पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.