आचार्य संत श्री लोकेशानंदजी महाराज यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी श्री जगन्नाथ भगवान रथयात्रेचे आयोजन

श्री श्री नारायण पुरम तीर्थ शहादा, येथे नारायण भक्ती पंथाचे संस्थापक आचार्य संतश्री लोकेशानंदजी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री जगन्नाथ भगवान रथ यात्रेचे आयोजन ,7जुलै आषाढ शुक्ल पक्ष द्वितीया तिथी , रविवार रोजी सकाळी 9वा.सप्तशृंगी माता मंदिर पासून सुरुवात होऊन पुढे स्टेट बँक, शहादा बस स्थानक ते डोंगरगाव रस्ता जवळील दादावाडी येथे समारोप करण्यात येणार आहे.
हिंदू धर्मात जगन्नाथांच्या रथयात्रेला अनन्य साधारण धार्मिक महत्त्व आहे
ओडिशाच्या पुरी राज्यात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो
भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि त्यांची बहीण सोबत रायांच्या दर्शनासाठी या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पुरीला भेट देतात.
या उत्सवा दरम्यान या तिन्ही देवतांचे तीन पवित्र रथ मोठ्या मिरवणुकीत काढण्यात येणार आहेत. रंग रचना आणि अप्रतिम सजावट यामुळे रथ आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. विविध प्रकारची फुले रांगोळी आणि दिव्यांनी ही मंदिराची सजावट केली जाणार आहे भगवान जगन्नाथ पुरी हे सर्वात पवित्र स्थान आहे. श्रद्धेनुसार हे असे स्थान आहे जिथे लोकांना भगवान श्रीकृष्णाची उपस्थिती जाणवू शकते कारण श्रीहरीचे हृदय भगवान जगन्नाथांच्या मूर्तीच्या आत धडधडत आहे .जगन्नाथांची रथयात्रा ही एक वार्षिक यात्रा आहे आणि देशभरातून मोठ्या संख्येने भाविक या अद्भुत उत्सवाची साक्षीदार होणार आहेत. भगवान जगन्नाथ आणि बलभद्र आणि देवी सुभद्रा यांना त्यांच्या गर्भगृहातून वेगवेगळ्या रथातून बाहेर काढले जाईल.


ओडिशातील जगन्नाथ पुरी प्रमाणेच शहादा येथे नारायण भक्ती पंथ द्वारा भगवान श्री जगन्नाथ यांची रथयात्रा काढण्यात येणार आहे. मध्यप्रदेश , गुजरात आणि महाराष्ट्रातील भाविकांची मांदियाळी शहादा शहरातील श्री श्री नारायण पुरम तीर्थ मंदिरात या रथ यात्रेसाठी जमली आहे तरी सर्व भाविकांनी या पावन यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन नारायण भक्ती पंथ शहादा द्वारा सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.