ख्याती पाटील यांना दुबईमध्ये मेकअप मास्टर क्लासचा इंटरनॅशनल प्रमाणपत्र प्रदान…


https://youtube.com/@mlanewsnetwork?si=COcHzmbdPw3hHSBW


युवतींना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण करणाऱ्या ब्राह्मणपुरी तालुका शहादा येथील नंदाई मेकअप ओव्हरच्या संचालिका ख्याती पाटील यांनी दुबई मध्ये मेकअप मास्टर क्लासचा कोर्स यशस्वी पूर्ण केला. नंदुरबार जिल्ह्यातील तसेच शहादा शहरातील युवती व महिलांना आर्थिक दर्जेदार व अद्यावत प्रशिक्षण देण्याचे काम ख्याती पाटील यांच्या माध्यमातून होणार आहे. ख्याती पाटील ह्या नंदाई मेक ओव्हर व नंदाई फाउंडेशनच्या माध्यमातून विहित पार्लरचे प्रशिक्षण घेऊन महिलांना स्वयंरोजगार निर्माण करून देण्याचे काम करत आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मुंबई (पनवेल) येथील अलका गोविंद इंटरनॅशनल आर्टिस्ट ग्रुपने ख्याती पाटील यांची दुबई मध्ये झालेल्या मेकअप मास्टर क्लास साठी निवड केली.त्यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवून यशस्वीरित्या कोर्स पूर्ण केल्याबद्दल त्यांना इंटरनॅशनल दुबई सरकार ISAS ब्युटी इंटरनॅशनल तर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.मेकअप मास्टर क्लासचा इंटरनॅशनल प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे.त्यांच्या यशाबद्दल सर्वांनाच विशेष करून शहादा शहरात आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट उपलब्ध झाल्या म्हणून महिला वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.त्यांच्या या अनुभवाचे महिला वर्गांना व युवतींना प्रशिक्षण,आपल्या पायावर उभे राहण्याचे साधन मिळेल आणि रोजगारही उपलब्ध होईल.

कॅप्शन :- ख्याती पाटील यांना दुबई येथे ISAS इंटरनॅशनल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
:- (सोबत ख्याती पाटील यांना प्रमाणपत्र मिळाल्याचा फोटो पाठवीत आहे)